…तर सर्दी तापाच्या रोगाप्रमाणे तुम्ही कोरोनातून बरे होऊ शकता!

मुंबई | कोरोना व्हायरस या विषाणूमुळे जगातील तब्बल 80 देश हादरले आहेत. भारतातही हा विषाणू पसरला आहे. तसेच कोरोनाबाबत अनेक गैरसमज लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी व्याधी असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला हे जोखमीच्या गटातील व्यक्ती असून यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर धोका निर्माण होऊ शकतो. मात्र आपली रोग प्रतिकारशक्ती उत्तम असलेले रूग्ण सर्दी तापाच्या आजारांप्रमाणे यातून पूर्णपणे बरे होऊ शकतात, असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं आहे.

कोरोनाबाबत समाजमाध्यमांवर माहिताची उद्रेक झाल्याने योग्य माहिती मात्र जनतेपर्यंत पोहोचू शकलेली नाही. लसूण, गोमूत्र इत्यादी सेवनापासून कोरोना बरा होतो, असाही दावा केला जात आहे. आणि लोक देखील त्यावर विश्वास ठेवत आहे, असं अविनाश भोंडवे म्हणालेत.

दरम्यान, आरोग्य साक्षरता शून्य असल्याने समाजमाध्यमांवरील विश्वास ठेवून पुढे सरकवण्याच्या वृत्तीने सतर्कतेऐवजी असुरक्षिता वाढवली असल्याचं डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यावर राज्यात पहिला गुन्हा दाखल

-कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर पुणे पोलीस करणार ‘ही’ कडक कारवाई

-“कोरोनाचं नाव पुढं करून राज्य प्रशासन लोकांना घाबरवत”

-“उलट्या वरातीत नाचणाऱ्या भाजपच्या ‘वऱ्हाडी’ मंडळींनी ‘हे’ लक्षात ठेवलेलं बरं”

-कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा विश्वास