महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्रातील लॉकडाउनचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांनी वाढवला जाऊ शकतो”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा कालावधी 14 एप्रिल रोजी संपत आहे. मात्र महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो, असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

15 एप्रिलपर्यंत राज्यातील करोनाबाधितांची संख्या कमी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सध्या हा आकडा वाढत आहे. आपल्याला लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमी आहे, असं मत टोपे यांनी व्यक्त केलं आहे.

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे निर्बंध राष्ट्रीय लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतरही कायम ठेवण्याचे संकेत टोपे यांनी दिले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या 47 ने वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता 537 करोनाग्रस्त आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-एका विषाणूसमोर गुडखे टेकणाऱ्यांपैकी आपण नाही, आत्मविश्वासाने लढू आणि जिंकू- उद्धव ठाकरे

-मी माझ्या महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवेन पण तुम्हाला सोडणार नाही- उद्धव ठाकरे

-निवडणूक आयोगाचा आदेश जारी; महाविकास आघाडीचं सरकार संकटात!

-डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा- अमित शहा

-“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, अनोख्या प्रकाशपर्वात सहभागी होऊ या”