Top news

लॉकडाऊनमध्ये पोलिस करत असलेल्या लाठीचारावर शरद पवार म्हणाले…

मुंबई | पंतप्रधानांनी 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये पोलीस पहारा देताना नागरिकांना लाठीचार करत असल्याचे प्रकार समोर आले. यावर शरद पवार यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

सध्या शिस्तीची गरज आहे. पोलिसांना इच्छा नसताना काही कठोर निर्णय घ्यावे लागले. त्याचा परिणाम दिसतोय. लोक शिस्तीने वागत आहेत. काही चार-पाच टक्के लोकांसाठी कठोर भूमिका घेतली. थोडे दिवस हे सहन करावं लागेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

परिस्थिती बदलतेय लोक सहकार्य करतायत हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सुद्धा सामंजस्याने वागावं. अत्यावश्यक सेवेच्या गाडयांना अडवू नये, अशी सूचना शरद पवार यांनी यावेळी बोलताना केली.  पवार यांनी आज फेसबुकवरुन राज्यातील जनतेशी संवाद साधला.

दरम्यान, आरोग्य सेवा आणि पोलीस आज आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. त्यांना विशेष प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या –

-अनेक क्षेत्रांना कोरोनाचा फटका; RBI गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या मोठ्या घोषणा

-कोरोनाचा सामना करण्यासाठी शरद पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींच्या 7 मोठ्या घोषणा

-आज महाराज असते तर त्यांनी माझा लढवय्या स्त्री म्हणून सन्मान केला असता- तृप्ती देसाई

-“मी मराठ्यांची लेक आणि सून; माझी बदनामी करणारे 80 टक्के तरुण मराठाच”