डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाग्रस्तचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी उचललं कडक पाऊल

रत्नागिरी | कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामध्ये काही लोक भीतीने आपला आजार लपवत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत इतरांनाही लागण होत आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाग्रस्तचा मृत्यु झाला आहे. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण 18 मार्च रोजी दुबईहून घरी आला होता. त्याच्या एका आठवड्यानंतर त्याला कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यानंतर तो खाजगी रुग्णालयात गेला. त्या रुग्णाला सरकारी रुग्णालयात न पाठवता डॉक्टरनं उपचार केले. त्यानंतर प्रकृती बिघडल्यानं या रुग्णाला 6 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती  जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांनी दिली.

या घटनेनंतर प्रशासनानं मृत्यु झालेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 19 जणांना क्वारंटाइनमध्ये दाखल केलं आहे. त्याचबरोबर गावसह आजूबाजूचा तीन किमी परिसर सील करण्यात आला असल्याचं  मिश्रा यांनी सांगितलं.

दरम्यान, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांनी तातडीनं घटनेची दखल घेत डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गुरूवारी डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या 

-‘रक्षक क्लिनिक’ पॅटर्न राज्यभर राबवण्याचा विचार केला जाईल- आरोग्यमंत्री

-वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!

-“गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा”

-दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

-देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5734 वर; 24 तासात 549 नवे रुग्ण