सायन रुग्णालयातील एक महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात; डॉक्टरांकडून टाळ्या वाजवून कौतुक

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लोकांना चिंता सतावत असताना दुसरीकडे दिलासा देणाऱ्या काही घटनाही समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली असून सायन रुग्णालयात दाखल एक महिन्याच्या बाळाने करोनावर मात केली आहे.

कोरोनावर मात केल्यानंतर बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून यावेळी नर्स, डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना टाळ्या बाजवून बाळ आणि त्याच्या आईला निरोप दिला.

रुग्णालयातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत बाळाची आई त्याला कुशीत घेऊन वॉर्डमधून बाहेर येत असताना नर्स, डॉक्टर आणि कर्मचारी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करत असल्याचं दिसत आहे.

कोरोनावर मात करणारं हे सर्वात लहान वयाचं बाळ ठरलं आहे. व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर नेटिझन्सदेखील सायन रुग्णालयातील डॉक्टर आणि इतरांचं कौतुक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सांगली जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफी योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-कसाबला फासापर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

-‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधींंचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले…

-जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे पाटील

-रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय