पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली होणार पण…

पुणे | राज्यात आजपासून मिशन बिगीन अगेन सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना रोज मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडता येणार आहे.

पुणे शहरातील 199 पैकी 150 उद्याने उद्या मंगळवारपासून सुरु होणार आहेत. या उद्याने किंवा मैदानात मंगळवारपासून मॉर्निंग वॉक करता येणार आहे. मात्र कोरोनाबाधित क्षेत्रातील उद्याने बंद राहणार आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या उद्यानात प्रवेश करता येणार आहे. पुणे शहरातील मैदाने किंवा उद्याने सुरु होणार असली तरी मॉल, मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट, धार्मिकस्थळे पुढील काही दिवस बंद राहणार आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बॉलीवूडचा दिग्गज गायक कोरोनाने हिरावला, संपूर्ण बॉलीवूड शोकसागरात

-…म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द

-क्रिकेटपटू शमीच्या पत्नीनं शेअर केला न्यूडफोटो, सोबत असलेल्या व्यक्तीवरुन तर्कवितर्क

-परप्रांतीय कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी- नितीन गडकरी

-सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, पण कारभारावर सडकून टीका!