वाह दादा वाह! गोर-गरीब गरजुंसाठी गांगुलीकडून 50 लाखांची मदत

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाखो लोकांना या व्हायरसचा फटका बसला आहे. योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास बसला आहे. उद्योगपती, उदयोजक पुढे येऊन सरकारला आर्थिक मदत करत आहेत. अशातच गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत करण्याचा निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने घेतला आहे.

21 दिवसांच्या लॉकडाऊनने अनेक लोक बाधित आहेत. अशा लोकांच्या समर्थनार्थ गांगुली पुढे आला आहे. त्यामुळेच 50 लाख रुपयांचे तांदूळ दान देण्याचे वचन गांगुलीने दिलं आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या निवेदनात जाहीर करण्यात आल्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी शाळांमध्ये ठेवलेल्या गरजू लोकांना लाल बाबा कंपनीच्या साथीने 50 लाखांच्या तांदळाची मदत गांगुलीकडून करण्यात येणार आहे.

लाल बाबा कंपनीनेही पत्रक जारी केली आहे.  या पत्रकात गांगुलीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुकही करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका- अजित पवार

-जनतेला धान्याऐवजी थेट पीठ देणार- बाळासाहेब थोरात

-मारहाण करुन पोलिसाचे हात दुखले; मुख्याध्यापकाला सांगितलं, लोकांना हाणा!

-महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 124 वर; मुंबई-ठाण्यात नवे रुग्ण सापडले

-‘देवदूतां’च्या मदतीला सिद्धिविनायक; लॉकडाऊनमध्ये पोलिसांसाठी जेवणाची सोय