Loading...
महाराष्ट्र मुंबई

खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये- उद्धव ठाकरे

मुंबई | खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्याच्या सीमा बंद असल्याने इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी आज वर्षा निवासस्थान येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

Loading...

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील, औषधे लोकांना मिळतील हे प्राधान्याने पाहावं. शेतकरी आणि विशेषत: शेतीच्या कामासाठी ये जा करणाऱ्या कुणालाही अडथळा होणार नाही हे पाहावे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आपण अतिशय नियोजनपूर्व पद्धतीने जात आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाची योग्य विभागणी करावी, अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून द्यावी आणि मुख्यालयाच्या संपर्कात रहावं, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या –

-लॉकडाऊनमध्ये पोलिस करत असलेल्या लाठीचारावर शरद पवार म्हणाले…

-अनेक क्षेत्रांना कोरोनाचा फटका; RBI गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या मोठ्या घोषणा

-कोरोनाचा सामना करण्यासाठी शरद पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींच्या 7 मोठ्या घोषणा

-आज महाराज असते तर त्यांनी माझा लढवय्या स्त्री म्हणून सन्मान केला असता- तृप्ती देसाई

Loading...