पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करण्याची शक्यता

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला 21 दिवसांचा लॉकडाउन 14 एप्रिलला संपत आहे. मात्र अद्यापही देशात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. आपला निर्णय जाहीर करण्याआधी नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

काही महत्त्वाचे निर्णय घेत लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता आहे. राज्यांच्या सीमा बंद राहणार असून कोणालाही प्रवास करण्यास परवानगी नसेल. जीवनाश्यक वस्तूंसाठी मात्र राज्यांमधील वाहतूक सुरु असेल.

प्रत्येकाचा जीव वाचवणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसंच करोनानंतरचं आयुष्य फार वेगळं असेल. वैयक्तीक आणि सामाजिक आयुष्यात फार मोठा बदल होईल, असं नरेंद्र मोदींनी सांगितल्याची माहिती बैठकीत उपस्थित नेत्यांनी दिली होती.

तर याच्या आधी पंतप्रधानांनी कोरोना संर्दभात दोनदा देशाला संबधित केलं आहे. एकदा थाळी आणि टाळ्या वाजवण्यान आवाहन केलेलं, तर दुसऱ्यावेळी दिवा लावण्याच आवाहन केलेलं.

महत्वाच्या बातम्या 

-कल्याण-डोबिंवलीत यंत्रणा अपूरी पडते, आरोग्य मंत्र्यांनी धारावीसारखी पाहणी करावी- राजू पाटील

-“किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही”

-बीएमसीच्या मदतीसाठी अक्षय कुमार धावला, मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी केली इतक्या कोटींची मदत

-कामापेक्षा मोठा कोणता ‘धर्म’ नाही या गोष्टीची जाणीव झाली- सत्यजीत तांबे

-बारामतीत ‘भिलवाडा पॅटर्न’ राबवा- अजित पवार