Loading...
महाराष्ट्र मुंबई

कोरोनाच्या संकटाची तीव्रता कमी होवो; राज ठाकरेंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटवरुन गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी होऊन पूर्ण सर्वत्र आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, अशा सदिच्छा राज यांनी ट्विट करुन दिल्या आहेत.

राज यांनी त्यांच्या ट्विटवर अकाऊटंवरुन एक ऑडिओ मेसेज पोस्ट केला आहे. वसुधैव कुटुम्बकम अर्थात वैश्विक कुटुंबाच्या ह्या काळात संपूर्ण जग एकत्रितपणे एका संकटाशी झुंज देत आहे. ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी कमी होत सर्वत्र पुन्हा एकदा आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, हीच सदिच्छा, असं ट्विट राज यांनी केलं आहे.

Loading...

ट्विटबरोबर एक ऑडिओ शेअर केला असून त्यामध्ये पसायदानातील ‘दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।’ या ओळी आहेत.

कोरोनाचं सावट गडद आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा रद्द करत आहोत, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी ट्विटवरुन मनसेने केली होती.

 

महत्वाच्या बातम्या – 

-“योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदींचं ऐकत नाही मग जनता त्यांचं का ऐकेल?”

-होळीला अ‌ॅडमिट, गुढीपाडव्याला डिस्चार्ज; पुण्यातील दाम्पत्याची ‘कोरोना’वर मात

-‘कोरोनाला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा’; अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा

Loading...

-जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या गोष्टी

-आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन, घराबाहेर पडण्यास बंदी; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Loading...