Loading...
महाराष्ट्र मुंबई

कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीम जयंती साजरी करू- रामदास आठवले

मुंबई | कोरोनाविरुद्धचा मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीमजयंती साजरी करूया. त्या आधी कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्याचा संकल्प करा. संयम ठेऊन घरीच थांबा आवाहन केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांनी केलं आहे.

कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

Loading...

दोन महिन्यांचे रेशन अन्नधान्य गरिबांना मोफत द्यावे. त्यासाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. आता खासगी उद्योजकांनी सीएसआर फंडातून गरिबांना मदत करावी असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी एक हजार 70 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करून गरिबांना नवसंजीवनी असल्याचं म्हणत आठवलेंनी निर्णयाचं स्वागत केलं.

महत्वाच्या बातम्या –

-खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये- उद्धव ठाकरे

-लॉकडाऊनमध्ये पोलिस करत असलेल्या लाठीचारावर शरद पवार म्हणाले…

-अनेक क्षेत्रांना कोरोनाचा फटका; RBI गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या मोठ्या घोषणा

-कोरोनाचा सामना करण्यासाठी शरद पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींच्या 7 मोठ्या घोषणा

Loading...