धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये मुंबईतून कोकणात जाण्यासाठी जिवंत काकीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलं पण…

मुंबई | कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून देशामध्ये 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. राज्यामध्येही संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून जिल्ह्यांच्या सीमा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. इतकं करूनही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करुन आपल्या गावी जाण्यासाठी दोन तरुणांनी आपल्या जिवंत काकीला पांढऱ्या चादरीत गुंडाळून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबईमधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने घाबरलेल्या दोन तरुणांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र भरणे नाका येथील नाकाबंदीला पोलिसांनी या तिघांना आडवलं. त्यावेळी या तरुणांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील आपल्या काकीचा मृत्यू झाला आहे असं सांगून पोलिसांपुढे हात जोडून जाऊ देण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी दोघांवर संशय आला.

ऑन ड्युटी असणारे पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना या मुलांवर शंका आली. खरोखर या महिलेचा मृत्यू झाला आहे का हे तपासण्यासाठी पोलिसांनी घरी व्हिडिओ कॉल लावण्यास सांगितला. संबंधित तरुणांच्या घरचे देखील या नाटकामध्ये सहभागी असल्याने त्यांनाही पोलिसांना महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितलं.

पोलिसांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता अखेर त्यांनी गावातील पोलीस पाटलाल फोन करुन चौकशी करण्यास सांगितले आणि काही वेळातच या तिघांचे बिंग उघडं पडलं. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांची दुचाकीही जप्त केली आहे. या दोघांनाही खेडमध्येच क्वारंटाइन करण्यात आलं असल्याची माहिती समजत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणेकरांची चिंता वाढली; नाना पेठ, कोंढवा, सिंहगड रोडवर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

-सरकारचा मोठा निर्णय! खासदारांच्या वेतनात वर्षभरासाठी ‘इतक्या’ टक्क्यांची कपात

-‘भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट’; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला इशारा

-मरकजला गेलेल्यांनी ताबडतोब संपर्क करा, अन्यथा…; मुंबई महापालिकेचा इशारा

-“दोन खासदारांचा पक्ष आज 300 खासदारांचा हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ”