Avinash Bhosale | अविनाश भोसले यांना न्यायालयाचा झटका

मुंबई | सीबीआयने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आलं होतं. आता अविनाश भोसले यांना ​मुंबईतील ​​​​​​सीबीआय विशेष न्यायालायाने 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.

सीबीआयने डीएचएफल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसलेंना अटक केली होती. सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेंचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. तसेच सीबीआयला अविनाश भोसलेंना मुंबईबाहेर नेण्यास मनाई कोर्टाने केली आहे.

अटकेनंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं होतं. सीबीआयने भोसलेंची 10 दिवसांसाठी कोठडी मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी कोठडीला विरोध केला होता. कोर्टाने हा दावा फेटाळला आहे.

दरम्यान, अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयनं चौकशी केली होती. अविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे.

व्यवसायासोबतच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात. काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. मात्र भोसले यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत संपर्क असल्याचं बोललं जातं.

रास्ता पेठ भागात ते भाड्याच्या घरात राहायचे. कालांतरानं त्यांनी रिक्षा भाड्यानं देण्याचा व्यवसाय सुरू केला. भोसलेंची ओळख बांधकाम क्षेत्रात आले. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील काहींच्या माध्यमातून त्यांना रस्त्याची कंत्राटं मिळू लागली.

महत्वाच्या बातम्या- 

राज्यसभेसाठी बाहेरचा उमेदवार दिल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ?; ‘या’ नेत्याने उचललं मोठं पाऊल 

“अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, पण दिल्लीसमोर झुकणार नाही” 

“बहुजनांची पोरं आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही” 

  काॅंग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

  मोठी बातमी ! राज ठाकरे रुग्णालयात दाखल