Top news क्राईम

संतापजनक! देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानानंच महिलेबरोबर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

सुकमा | छत्तीसगढ मधील सुकमा जिल्ह्यातून अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तैनात असलेल्या केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF) मधील एका जवानानंच आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे.

27 जुलै रोजी डब्बाकोंटा शिवीर जवळच एका आदिवासी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या महिलेनं सीआरपीएफ मधील एका जवानानं बलात्कार केल्याची तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. छत्तीसगढ पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शिपाई दुलीचंदविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सीआरपीएफच्या छत्तीसगढ सेक्टर मधील अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी छत्तीसगढ पोलिसांना पोलीस कारवाईसाठी संपूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याबरोबरच, संबंधीत आरोपीसोबत त्यावेळी घटनास्थळी तैनात असणारा एक हवालदार आणि शिपाई यांनाही निलंबित केलं आहे.

सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी पीडित महिला व तिच्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे. दरम्यान, या घटनेमुळे सीआरपीएफ जवानांविषयी स्थानिक लोकांच्या मनात दहशत तयार झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली- उपमुख्यमंत्री

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर दु: खाचा डोंगर; राजेश टोपेंच्या मातोश्रींचं निधन

“आम्ही येतोय रे ठाण्याला कोण अडवतंय बघूया, हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे”

दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

देशाच्या राजकारणावर पसरली शोककळा ‘या’ खासदाराचे निधन