Top news खेळ

CSK vs MI: मुंबईसोबतच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका!

chennaii e1650538983357
Photo Credit - Twitter / @ChennaiIPL

मुंबई | आयपीएलच्या 15व्या हंगामातील आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे दोन दिग्गज संघ आमनेसामने असणार आहेत. चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं आवश्यक आहे.

मागील हंगामापर्यंत आयपीएल गाजवणारे हे दोन संघ आता एका एका विजयासाठी झटत असल्याचं समोर आलं आहे. चॅम्पियन अशा मुंबईच्या संघाला अद्याप एकही विजय मिळवता आला नाही.

तर दुसरीकडे चेन्नईची स्थिती चांगली अशातला भाग नाही. चेन्नईला केवळ एकच विजय मिळवता आला आहे. अशातच आता जडेजाच्या चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.

सामन्यापूर्वी एक स्टार खेळाडू संघाबाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेव्हन कॉनवे संघाबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तो आता आजच्या सामन्यात दिसणार नाही.

डेव्हन कॉनवे चेन्नईविरुद्धच्या पुढील सामन्यापूर्वी पुनरागमन करणार आहे. नुकतीच डेव्हन काॅनवेने एका हाॅटेलमध्ये शानदार पार्टी दिली होती. त्यात धोनी आणि चेन्नईचे इतर खेळाडू देखील उपस्थित होते.

दरम्यान, आजचा सामना हा दोन्ही संघासाठी महत्तवाचा असणार आहे. मुंबई-चेन्नईचा सामना हा भारत-पाकिस्तान सामन्यासारखा पाहिला जातो. त्यामुळे आजच्या सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सिंगल लोकांनो नक्की वाचा! विवाहित पुरूषांबाबत कंगणा राणावत म्हणाली…

चिंताजनक! कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; संशोधनातून ‘ही’ 4 भलतीच लक्षणं समोर

मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेला अखेर इंदौरमधून अटक

“जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?”

मोठी बातमी! ईडीचा नवाब मलिकांना झटका, आता…