केंद्र सरकारला खडेबोल सुनावणाऱ्या न्यायमूर्तींची बदली आम्ही केली नाही तर…- भाजप

मुंबई | नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन दिल्लीत हिंसाचार उसळला आहे. आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जाणीवपूर्वक ही बदली केल्याचा आरोप होत आहे. त्यावर महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत याबाबतचा खुलासा केला आहे.

केंद्र सरकारने न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली केली नाही. त्यांच्या बदलीची शिफारस १२ फेब्रुवारी रोजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्तींच्या कॉलेजियमने केली होती व त्यानंतर बदलीसाठी संबंधित न्यायमूर्तींची मान्यता घेण्यात आली होती. त्यानंतर विधी व न्याय खात्याने केवळ अधिसूचना जारी केली. २ न्यायमूर्तींच्या नियुक्त्या व बदल्या कॉलेजियमच्या शिफारशीने होतात त्यामध्ये सरकारचा सहभाग नसतो, असं उपाध्ये यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

न्या. मुरलीधर यांच्यासोबत न्या. रणजीत मोरे यांची मुंबईहून मेघालय उच्च न्यायालयात तर न्या. रवि मालिमठ यांची कर्नाटकातून उत्तराखंड इथे बदली झाली. सर्वात महत्वाचे न्य़ायमूर्ती मुरलीधर यांच्या बेंचपुढे मुळात कथित वादग्रस्त विधानांचा विषय सुनावणीस नव्हता. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे सुनावणीस होती. मुख्य न्यायमूर्ती रजेवर असल्याने तातडीच्या प्रसंगात न्या. मुरलीधर यांच्या पुढे याचिकेची सुनावणी झाली. त्यानंतर ते मूळ पदावर राहिले तरी ही याचिका मुळात मुख्य न्यायमूर्तींसमोरच सुनावणीस येणार होती आणि आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने या तीन न्यायाधिशांच्या बदल्यांच्या अधिसूचना केव्हा काढल्या याबाबतची सर्व माहिती केंद्रीय कायदा खात्याच्या उपलब्ध आहे. या तिघांच्या बदल्यांचे आदेश एकाच वेळी निघाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

बुधवारी न्यायमूर्ती मुरलीधर यांनी दिल्ली हिंसाचार सुनावणी प्रकरणात भाजप नेते कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्यावर अजून एफआयआर का दाखल नाही असं विचारत पोलिसांवर कडक ताशेरे ओढले होते.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-चंद्रकांतदादा म्हणाले, ‘रात्री निर्णय अन् सकाळी शपथ’; त्यावर अजितदादा म्हणाले..

-“इंदोरीकरांवर 15 दिवसांत गुन्हा दाखल करा, नाहीतर…”

-शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी ठाकरे सरकार उद्या जाहीर करणार

-खासदार सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअ‌प स्टेटसला फडणवीसांचा फोटो अन् कॅप्शनमध्ये म्हणाल्या…

-‘उद्धव ठाकरेंना लाज वाटत होती काय?’; नारायण राणेंचं टीकास्त्र