देश

दिल्लीत ‘आप’ची जोरदार आघाडी; पाहा कोण किती जागांवर आघाडीवर

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे कल पाहता मतदारांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या बाजुने कौल दिल्याचं समोर आलं आहे. यात ‘आप’ला 53 तर भाजपला 17 जागांवर आघाडी मिळाली असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या पदरी मोठी निराशा पडली आहे.

दिल्लीच्या सर्व 70 जागांचे कल हाती आले आहेत. आम आदमी पक्षाचे 53 उमेदवार सध्या आघाडीवर आहे. दुसरीकडे धक्कादायक गोष्ट म्हणजे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया हे सध्या 1500 मतांनी पिछाडीवर आहेत.

Loading...

दिल्ली विधानसभेचे जे काही कल हाती येत आहेत यामध्ये भाजप आणि आपमध्ये मोठं अंतर आहे. तरीसुद्धा सगळे निकाल स्पष्ट व्हायला आणखी काही वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. मला आशा आहे की भाजपला आणखी काही ठिकाणी विजय मिळेल, असं दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले आहेत.

आम आदमी पक्षाने बहुमत गाठल्याने दिल्लीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषालाही सुरुवात केली आहे. भाजपच्या पदरी अपयश पडल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीमध्ये काहीही होऊ…. मी जबाबदार- मनोज तिवारी