देश

भीक मागणाऱ्या महिलेनं शहिदांना केलेली मदत पाहून तुम्हीही सलाम ठोकाल

Devaki Sharma

नवी दिल्ली : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताच्या जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. संपूर्ण देशात या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानचा बदला घेण्याची भाषा केली जात आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी देशभरातून मदत सुद्ध सुरु आहे. या साऱ्या कोलाहलात एका भीक मागणाऱ्या महिलेनं शहीद कुटुंबियांना केलेल्या मदतीची एकच चर्चा आहे. आता भीक मागणारी महिला करुन करुन किती मदत करेल असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. कारण बातमीच्या शिर्षकात सांगितल्याप्रमाणे ही रक्कम ऐकून खरंच तुम्ही या महिलेला सलाम ठोकाल.

किती रक्कम दिली शहीदांना-

देवकी शर्मा असं या भीक मागणाऱ्या महिलेचं नाव आहे. तीने एक दोन नव्हे तर तब्बल ६ लाख ६१ हजार रुपयांची मदत शहीद जवानांच्या कुटुंबियांना केली आहे. भीक मागणाऱ्या लोकांकडे कुठून आलाय इतका पैसा? असं तुम्हाला वाटत असाल तर तुम्ही चुकत आहात. कारण हे खरं आहे. देवकी शर्मा यांच्याकडे भीक मागून जमवलेले ६ लाख ६१ हजार रुपये होते. हेच पैसे शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून दिले जाणार आहेत.

कुठला आहे नक्की प्रकार?-

देवकी शर्मा या राजस्थानच्या अजमेरमधील आहेत. येथील एका मंदिराबाहेर त्या गेल्या ७ वर्षांपासून भीक मागत होत्या. त्या सध्या जिवंत नाहीत. ६ महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी आपली जमापुंजी अंबे माता मंदिराच्या विश्वतांकडे जमा केली होती. आपल्या कमाईचा चांगल्या कामासाठी वापर व्हावा, अशी त्यांनी इच्छा होती.

Devaki Sharma donates

विश्वस्तांकडून योग्य वापर-

 अंबे माता मंदिराचे विश्वस्त संदीप गौड यांनी देवकी शर्मा यांची इच्छा पूर्ण केली आहे. देवकी यांनी भीक मागून जमवलेली रक्कम त्यांनी डीडीच्या सहाय्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहे. आता ही मदत शहीदांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

देवकी शर्मा आज आपल्यात नाहीत, मात्र भीक मागून मिळालेली त्यांनी रक्कम शहीदांना दिली गेल्याने त्यांना लोक सलाम करत आहेत. ही माहिती अनेक जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.