हिंमत असेल तर सांगाच, आम्ही मुस्लिमांना आरक्षण देवू शकत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई | धर्माच्या आधारे मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध असून त्यांना आम्ही आरक्षण देऊ शकत नाही, हे मुख्यमंत्र्यांनी हिमताने सांगावं, असं आव्हान विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.

विधानपरिषदेत शासनाच्यावतीने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली. यावर मुख्यमंत्र्यांचं मत वेगळं असेल तर त्यांनी स्पष्ट करावं. आमच्यापर्यंत मुस्लिम आरक्षणाचा विषय आलेला नाही, असं गालेगोल उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं, अशी टीका फडणवीस यांनी केली. पत्रकार परिेषदेत ते बोलत होते.

आरक्षणाचा विषय हा तुमच्याच मंत्र्यांनी मांडला आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नसल्याचं ठाकरेंनी स्पष्टपणे सांगावं, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांचा वचनभंग झाला असल्याचं म्हणत फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या-

-बौद्ध समाजावर टीका करत अभिनेत्री केतकी चितळेनं फोडलं नव्या वादाला तोंड!

-“सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा”

-मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पार पडणार फडणवीसांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

-अहमदनगरच्या आरोपींना मोक्का लावा; तृप्ती देसाई आक्रमक

-“मोदीजी, जरा बेरोजगारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांबाबतही पुढाकार घ्या म्हणजे अडचणी समजतील”