…म्हणून शरद पवार घाबरत आहेत- देवेंद्र फडणवीस

मुंबई |  एनआयएच्या तपासाला शरद पवारांचा विरोध आहे. चौकशीतून सत्य बाहेर येणार आहे. त्यामुळे ते घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांचा विरोध आहे. चौकशीतून शहरी नक्षलवाद्यांचे सत्य बाहेर येईल म्हणून समांतर चौकशीचा आटापिटा सुरु आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर टीका केली आहे. ते मुंबईत बोलत होते.

कायद्यामध्ये केंद्र सरकारला एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे, हे मान्य. पण राज्याची संमती घेण्याची पद्धत आहे. हा प्रकार घडला तेव्हा फडणवीस सरकार होतं. त्यामुळे या घटनेत काहीतरी लपवण्यासारखं असेल, म्हणूनच केंद्राने हा तपास एनआयएकडे दिला असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी केला होता. यावर फडणवीसांनी पटलवार केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआयकडे तपास सोपवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत ताळमेळ नसल्याचं समोर आलं होतं. तसेच शरद पवारांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणाचा राज्य सरकार तपास करत असताना केंद्र सरकारने एनआयकडे तपास सोपवला होता. राज्य शासनाला विश्वासात न घेता केंद्राने हा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीने टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या, नरेंद्र दाभोळकरांच्या संस्कारात वाढलोय- सुप्रिया सुळे

-इंदुरीकर महाराजांना पाठिंबा देणारा ‘हा’ स्टेटस व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

शरद पवारांनी नाशिक दौरा रद्द करून उद्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक!

-इंदुरीकरांसह त्यांच्या समर्थकांवर कारवाई करा; तृप्ती देसाई थेट गृहमंत्र्यांच्या भेटीला

-“आता मी महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही”