Top news महाराष्ट्र मुंबई

एवढ्या जागा जिंकूनही मी मुख्यमंत्री झालो नाही याचं वाईट वाटलं- फडणवीस

मुंबई | सरकार बनवण्यासाठी अनुकूल वातावरण असताना सत्ता हातातून निसटत गेली. एवढ्या जागा जिंकूनही आपण मुख्यमंत्री झालो नाही. याचं वाईट वाटलं. माझं मुख्यमंत्रीपद गेलं या गोष्टीवर विश्वास बसायलाच दोन दिवस गेले, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

द इनसायडरशी फडणवीसांनी दीर्घ संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी देशाने पाहिलेल्या त्या 36 दिवसांच्या सत्तासंघर्षातील अनेक पदर उलगडून दाखवले. तसंच काही काही गौप्यस्फोट देखील केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,  “तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात अशी कल्पना मला केंद्रिय नेतृत्वाने दिली होती. केंद्रिय नेतृत्व मला सारखं तुम्हाला लीड करायचं…. तुम्हाला लीड करायचंय… असं सांगत होतं. त्यामुळे मला कल्पना आली होती की पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. पण आमच्या पद्धतीनुसार ते कुणाला कळू द्यायचं नव्हतं.”

“कुटुंबियांनादेखील या बद्दलचं काही एक माहिती नव्हतं. अगदी या कानाची दुसऱ्या कानाला देखील खबर पोहचवायची नव्हती. त्यामुळे मी बाहेर कुणालाही काहीही बोललो नाही. त्यामुळे माझा आनंदही बाहेर दिसला नाही. साहजिक बातमी कळाल्यावर जसा आपल्याला एकदम आनंद होतो ती स्थिती माझ्याबाबतीत काही आली नाही. ”

महत्वाच्या बातम्या-

-हजारो भारतीयांना आता नोकरीसाठी अमेरिकेची दारं बंद कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला हा निर्णय!

-विश्वासघात केल्यामुळे शिवसेनेविषयी संताप आला; फडणवीसांनी सांगितली ‘ही’ २ कारणं!

-माझ्या नादी लागू नको नाहीतर तो व्हिडीओ… सोनू निगमची फिल्म इंडस्ट्रीतल्या या बड्या आसामीला धमकी

-मुख्यमंत्रिपद गेलं यावर विश्वास बसायला दोन दिवस लागले- देवेंद्र फडणवीस

-नवविवाहितेची आत्महत्या; अंत्यविधीवेळी पतीनं केलेलं कृत्य ऐकून काळजाचा थरकाप उडेल