मराठा तरूणांना नियुक्त्या न मिळणं हे दुर्दैवी- देवेंद्र फडणवीस

मुंबई | सकल मराठा समाजाच्या पाठिंब्याने एसईबीसी आणि ईएसबीसी उमेदवारांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाच्या तरुणांचं गेल्या 27 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र, अजूनही तरुणांना नियुक्त्या न मिळणं हे दुर्देवी आहे, असं विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि नितेश राणेंनी आज आझाद मैदान येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

नियुक्त्या देणं हे सरकारच्या हातात आहे. याअगोदरही आझाद मैदानात मराठा समाजाच्या तरुणांनी आंदोलनं केली. मात्र, आम्ही त्यांना जास्त वेळ बसू दिलं नाही. आता सुरु असलेल्या आंदोलनाला 27 दिवस झाले. हे दुर्देवी आहे. याबाबत कायदेशीर मुद्यावर सरकारला प्रश्न विचारु, असं फडणवीस म्हणाले.

मराठा उमेदावारांना नियुक्त्या का दिल्या नाहीत? हा प्रश्न विचारु. हा पक्षाचा मुद्दा नाही. सरकार हे प्रश्न अयोग्य पद्धतीने हाताळत आहे. याबाबत सरकारला जाब नक्की विचारू, असंही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-नवी मुंबई निवडणुकीपूर्वी फडणवीसांना धक्का… शिवसेनेसाठी गुडन्युज!

-आतापर्यंत या 2 व्यक्तींसाठीच मी माझ्या खिशातल्या पैशांनी हार विकत घेतलाय- गडकरी

-छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवाच कारण…- राणुआक्का

-ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

-कम्युनिस्ट पक्षाच्या ‘या’ नेत्याची नितीन गडकरी पुजा करायचे!