Loading...
औरंगाबाद महाराष्ट्र

नाईट लाईफ करून श्रीमंतांच्या पोरांची सोय केली शेतकऱ्यांचं काय करणार आहात??- फडणवीस

परभणी |  राज्य सरकारने काह दिवसांपूर्वी मुंबईत नाईट लाईफ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं तर अनेकांनी कडाडून टीकाही केली. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाईटलाईफच्या निर्णयावर बोलताना नाईट लाईफ करून श्रीमंतांच्या पोरांची सोय केली शेतकऱ्यांचं काय??, असा सवाल शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठा करे यांना विचारला. ते परभणीत बोलत होते.

नाईट लाईफ झाल्याने श्रीमंतांच्या पोरांची चंगळ होईल किंबहुना त्यांना त्याचा फायदा होईल पण शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्यांना 3 ते 4 दिवस रात्रीची वीज असते. रात्री शेतात पाणी द्यायचं म्हणजे काय हाल होतात हे आपल्याला माहिती आहे. सरकारने श्रीमंतांच्या पोरांची चिंता केली पण सरकारला शेतकऱ्यांची देखील चिंता करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले.

Loading...

दुसरीकडे आमच्या सरकारने मराठवाड्याच्या पाण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सुरू केली होती. त्या योजनेला काहीतरी कारणं सांगून स्थगिती देऊ नका, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, फडणवीसांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. टेक्निकल गोष्टी सांगून योजना बंद पाडायच्या हा सरकारचा इरादा असल्याची टीका फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-अस्तनीतले निखारे विझवायलाच हवेत; मनसेचा एल्गार!

-हिंगणघाट पीडितेचा संपूर्ण खर्च मी उचलतो; उद्योगपती आनंद महिंद्रा यांचं ट्वीट

-आम्ही ऑपरेशन करणार नाही, तर लवकरच सरकारचं सीजर होईल; बबनराव लोणीकरांचं टीकास्त्र

-देशात बेरोजगारी एवढी वाढलीय की देशातील तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाठ्यांनी मारतील- राहुल गांधी

-शिवसेनेने माझ्या आमदारकीचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन- तानाजी सावंत

Loading...