छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार- फडणवीस

पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार आहे. त्या पुतळ्याची उंची 140 फूट एवढी असणार आहे. हा पुतळा सर्व तरूणांना प्रेरणा देणार शिल्प ठरेल, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी थडी जत्रेचं आयोजन केलं आहे. या जत्रेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते.

छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेतले तरी तरुणांमध्ये एक वेगळी उर्जा येते. या शिल्पाच्या उद्‌घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही यावे अशी आमची अपेक्षा आहे, असं आमदार महेश लांडगे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगत असतात जोपर्यंत महिला सक्षम होणार नाहीत, तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशाकडे आपण जर पाहिले तर त्या देशाने केव्हाच प्रगती साधली आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘रंग बरसे’ गाण्यावर आमदार प्रशांत गडाखांनी पत्नीसह धरला ताल…!; पाहा व्हीडिओ

-अजूनही देशात नथुराम गोडसेंची मानसिकता जिवंत आहे- नवाब मलिक

-CAA कायद्यामुळे महात्मा गांधीजींचं स्वप्न पूर्ण झालं- राष्ट्रपती

-आज असा नटलाय… लग्नात पण एवढा नटला नसशील; दादांच्या तुफान फटकेबाजीने उडाले हास्याचे कारंजे

-जालन्यात टोळक्याची प्रेमी युगुलाला मारहाण; पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय??