महाराष्ट्र सरकारने सुशांतच्या प्रकरणावर आत्मचिंतन करण्याची गरज; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलिसांकडून घेऊन सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान हा निकाल दिला आहे. याचाचा धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

सुशांतच्या प्रकरण हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सराकारवर टीका केली आहे. यासंर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला, सर्वोच्च न्यायालयाने न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय घेतला असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.  त्यासोबतच सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांतच्या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलीस करत होती तेव्हा फडणवीसांनीही सीबीआयकडे हा तपास सोपवावा, अशी मागणी केली होती. आज हा निकाल लागल्यावर फडणवीसांनी ट्विट करत ठाकरे सरकारला आत्मचिंतनाची गरज असल्याचं म्हणत डिवचलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-