Top news कोरोना

मुंबईतील रूग्णालयाबाहेरचे 1000 मृत्यू का लपवले? देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | विरोधी पक्षनेचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये रुग्णालयाबाहेर झालेले 1000 मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आकडेवारीची अचूकता हाच कोरोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार असल्याने याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं फडणवीस यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मुंबईत ज्या रुग्णांचा मृत्यू रुग्णालयाबाहेर झालेला आहे असे मृत्यू दाखवण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले असून अशांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असेही किमान 1000 मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही.’

 

 

फडणवीस पुढे म्हणतात, ‘प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान 450 मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा फार तर 72 तासांत तशी नोंद होणं आवश्यक आहे. परंतु, तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करुन ते मृत्यूसंख्येत अधिक करणं, ही अतिशय चुकीची रणनीती आहे.’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्र्यांना 15 जून 2020 रोजी पतिर लिहिलं होतं. त्यामुळे कोरोनामुळे झालेले सुमारे 950 मृत्यू दाखवण्यात आलं नसल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

 

-सुशांतचा ‘दिल बेचारा’च्या रिलीजची तारीख ठरली, ‘या’ दिवशी पहायला मिळणार सिनेमा

सुशांतच्या ट्विटर पोस्ट डिलीट? पोलिसांचं ट्विटरला पत्र