“सध्या लगोलग सगळ्यांना मंत्रिपद देणं शक्य होणार नाही, त्यामुळे…”

मुंबई | आपल्या पदरी मंत्रिपद पडेल अशा आशेवर अनेक आमदार आहेत. तशा शिफारशीही देवेंद्र फडणवीसांकडे येत आहेत. यावर कालच्या भाजपच्या बैठकीत फडणवीसांनी आमदारांना काही सूचना दिल्या आहेत.

सध्या लगोलग सगळ्यांना मंत्रिपद देणं शक्य होणार नाही, त्यामुळे जरा कळ सोसा… काही लोकांना मंत्रिपदासाठी थोडं थांबवा लागेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मला माहिती आहे, आपलं सरकार पुन्हा सत्तेत येतंय. त्यासाठी तुम्ही सगळे आनंदी आहात. या सरकारचा भाग होण्याची तुमची इच्छा आहे. पण सध्या लगोलग सगळ्यांना मंत्रिपद देणं शक्य होणार नाही, त्यामुळे जरा कळ सोसा… काही लोकांना मंत्रिपदासाठी थोडं थांबवा लागेल, असं ते म्हणालेत.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे. या चर्चेत नव्या मंत्रिमंडळा संदर्भात चर्चा होणार आहे. दुपारपर्यंत नव्या मंत्रिमंडळाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचं बोललं जात आहे. यानंतर 12 वाजता शिंदे गटाची बैठक होणार आहे, अशी माहिती आहे. मात्र त्याआधी संभाव्य मंत्रीमंडळाची यादी समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे, रवींद्र चव्हाण, डॉ. अशोक उईके, सुरेश खाडे, जयकुमार रावल, अतुल सावे, देवयानी फरांदे, रणधीर सावरकर, माधुरी मिसाळ या नेत्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, बच्चू कडू, तानाजी सावंत, राज्यमंत्री दीपक केसरकर, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, भरत गोगावले, या नेत्यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंसह 14 आमदारांना थेट इशारा, म्हणाले… 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, वाचा संभाव्य मंत्रीमंडळ 

“स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणे उभे राहिले” 

औरंगाबादच्या नामांतरावरुन जलील आक्रमक, म्हणाले ‘या दलाल नेत्यांवर थुंका’ 

आता महाराष्ट्रात येणारं भाजप सरकार पुढील 25 वर्षे चालेल- देवेंद्र फडणवीस