“मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेवायला बोलवलं तर…”

मुबंई | आगामी महापालिका निवडणुका पाहता भाजप-मनसे जवळीक होईल असं राजकीय विश्लेषक सांगत आहे. परंतु अद्यापही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावर अधिकृत भूमिका मांडली नाही.

काही दिवांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीनंतर भाजप-मनसे (BJP-MNS) युतीच्या चर्चेला उधाण आलं.

आता या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेवायला बोलवलं तरी मी जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

राज ठाकरे प्रभावी नेते आहे. त्यांनी नवीन घरं बांधलं तेव्हा मी स्वत: त्यांना अभिनंदनांचा फोन केला. तेव्हा राज ठाकरेंनी कोविड काळामुळे कार्यक्रम घेता आला नाही. मात्र अनेक मित्रांना मी घरी बोलावलं.

तुम्ही आणि वहिनी जेवायला या असं निमंत्रण त्यांनी दिलं. तेव्हा आम्ही जेवायला गेलो. राज ठाकरेंकडे खूप माहिती असते. राज ठाकरेंना प्रत्येक विषयाचं ज्ञान चांगले आहे. वेगवेगळ्या विषयावर आम्ही गप्पा मारल्या, असंही फडणवीसांनी सांगितलं.

आम्ही युती करण्यासाठी गेलो नव्हतो. भाजपा-मनसे युतीबाबत काहीही चर्चा नाही. सध्यातरी भाजपा स्वबळावर जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान,सत्ता परिवर्तनसाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करत नाही. अंतर्विरोधामुळे हे महाविकास आघाडी सरकार पडेल. सरकार कोसळेल वाटतं तेव्हा ते मजबूत होतं. भ्रष्टाचार या एका मुद्यावर महाविकास आघाडी सरकारला मजबूत ठेवलं आहे, असं फडणवीस म्हणालेत.

2024 पर्यंत भाजप जनतेच्या मनात इतकी जागा करेल की तेव्हाच्या निवडणुकीत भाजप एकटं सरकार स्थापन करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

“कोण म्हणतं की लोकसभा कामासाठी आकर्षक जागा नाही” 

महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं 

“फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार येणार, आम्ही महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार” 

‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं आली समोर 

संसदेत प्रश्न विचारा, आम्ही खुल्या चर्चेला तयार, पण…- नरेंद्र मोदी