महाराष्ट्र

बास की आता उद्धवजी, सत्तेसाठी अजून किती लाचार व्हाल?- देवेंद्र फडणवीस

मुंबई | काँग्रेस पक्षाकडून सातत्याने महापुरूषांचा अपमान केला जात आहे. मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आला. काँग्रेसचं मुखपत्रं ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यावीर स्वारकरांना अपमानित करणारा लेख लिहीला. त्यामुळे शिवसेना सत्तेच्या लालसेपोटी किती लाचार होणार असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

सावरकरांचा गौरव राहुद्या पण अपमान तरी करू नका. सावरकरांचा असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार आहे?, असा सवालही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.

छत्रपतींचा अपमान भारत कधीच सहन करणार नाही. मध्य प्रदेश सरकारने देशाची माफी मागावी. तसेच राष्ट्रपुरूषांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या जागेवरून हलवण्यात आला होता त्याच जागेवर महाराजांचं स्मारक उभारून विधीवत स्थापना होणार आहे. या स्थापनेवेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हजर राहणार असल्याचं काँग्रेस नेते सुनील केदार यांनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-इंदूरीकर महाराजांना आणखी एक जबर धक्का!

-… तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांचं नक्की जमेल- शरद पवार

-औरंगाबाद दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतले शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरेंचे आशिर्वाद!

-भाजपमध्ये नेतृत्वाची दहशत आणि नेत्यांमध्ये घुसमट- शरद पवार

-काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून बाळासाहेब थोरातांना हटवा; अशोक चव्हाणांचं सोनियांना पत्र?