Loading...
कोकण महाराष्ट्र

अंगाऱ्या धुपाऱ्याने मंत्री झालेल्या पाटलांचं पद दोन चार महिन्यात जाणार- धनंजय महाडिक

कोल्हापूर | कुठला अंगारा, कुठला बाबा यांच्याकडे आहे माहित नाही, हे पुन्हा मंत्री झाले. पण हे मंत्रिपद दोन-चार महिन्यांच्यावर टिकणार नाही, अशी भविष्यवाणी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याबाबत वर्तवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. महाडिकांनी पुन्हा एकदा नाव न घेता सतेज पाटलांवर निशाणा साधला आहे. हे मंत्री झाले, पण यांचं मंत्रिपद जास्त काळ टिकणार नाही, अशा शब्दात त्यांनी पाटील यांना टोमणा लगावलाय.

Loading...

नशीब आहे, हे मंत्री झाले. मंत्री झाले हे ठिक आहे. पण त्यांना चांगली कामं करता येण्यासारखी असताना मंत्रिपदाची शपथ घेतल्या घेतल्या यांच्या कार्यकर्त्यांनी उद्योग सुरु केले आहेत, असं महाडिक म्हणाले.

आमच्या कार्यकर्त्यांच्या घरावर दगडे मारणे, केबल कापणे, महिला अधिकाऱ्यांना धमकावणे, दरडावणे, रडवणे… मला या चमच्यांना सांगायचं आहे. जास्त उड्या मारु नका, दोन-तीन महिन्यात यांचं मंत्रिपद जाणार आहे, अशा शब्दात त्यांनी सतेज पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची खिल्ली उडवली.

महत्त्वाच्या बातम्या-

-कर्जमाफीच्या हिशेबात बँकांचा घोळ; मंत्री बच्चू कडू यांचा धक्कादायक अहवाल

-कोर्टात जाताना हिंगणघाटच्या आरोपीने केली ‘ही’ इच्छा व्यक्त!

-शालिनीताईंचा अजित पवारांशी पंगा; तात्काळ सत्तेवरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी

-मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी ‘आप’ला मतदान करा; मतदानादिनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं ट्वीट

-काश्मिरची सुरक्षा महत्त्वाची… इंटरनेट हा मुलभूत अधिकार नाही- प्रसारण मंत्री

Loading...