मुंबई | आयपीएलच्या (IPL 2022) इतिहासातील सर्वाधिक विजेतेपदं पटकावणारा मुंबई इंडियन्स संघ यावर्षी मोठ्या अडचणीत सापडला आहे. संघ आतापर्यंत 8 सामन्यापैकी एकाही सामन्यात विजयी होऊ शकला नाही.
मुंबई संघाच्या निराशजनक कामगिरीवर सर्वस्तरातून नाराजी वर्तवण्यात येत आहे. मुंबई संघ येणाऱ्या सामन्यांमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
मुंबईला दोन दिवसांपूर्वीच एक धक्का बसला होता. त्यांचा अष्टपैलू खेळाडू अर्शद खान दुखापतीमुळं संघाबाहेर गेला होता. आता संघात एका दिग्गज गोलंदाजाची एंट्री झाली आहे.
अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णी हा मुंबईच्या स्क्वाडमध्ये दाखल झाला आहे. येणाऱ्या सामन्यांमध्ये धवल खेळताना पहायला मिळू शकतो.
धवल मागचे दोन सिजन मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्यानंतर यावर्षीच्या मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघानं खरेदी केलं नव्हतं. काही सामन्यात धवलनं समालोचकाची भूमिका पार पाडली होती.
मेगा लिलावात धवलला संघात घेण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आग्रही होता. पण धवलला प्रत्यक्ष लिलावात संघात सामिल करण्यात आलं नव्हतं. पण धवल आता मुंबई इंडियन्सचा भाग असणार आहे.
मुळचा मुंबईचा असलेला धवल मुंबई आणि पुणे या भागात बरेच सामने खेळला आहे. परिणामी या परिस्थितीत गोलंदाजी करण्याचा त्याला चांगला अनुभव आहे.
दरम्यान, समालोचकाची भूमिका पार पाडून क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ घालण्यात आरसीबीचा दिनेश कार्तिक हा यशस्वी ठरला आहे. आता धवल कुलकर्णी काय करणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाबमध्ये मोठा राडा! शिवसेना आणि शीख संघटना एकमेकांना भिडले, SHO जखमी
“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार”
‘…तर कुणी मानसिक रोगी’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना विचारा…”; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला