क्राईम पुणे महाराष्ट्र

मैत्रीच्या नात्याला काळिमा! दारू पिताना झालेल्या वादात मित्रानेच केला मित्राचा खून

पुणे | पुण्यातील हडपसर येथे मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर येथून मे महिन्यात एक तरुण बेपत्ता झाला होता. त्या तरुणाचा मित्रानेच गळा दाबून खून केल्याचं तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आलं. विकी अशोक रणदिवे असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

विशाल राजू पिल्ले (वय24) हा तरुण 10 मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार हडपसर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्यानंतर 15 मे रोजी यवतमाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅनॉलमध्ये एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाहत आलेला मिळाला. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी विशालच्या नातेवाईकांना बोलवण्यात आलं. नातेवाईकांनी तो मृतदेह विशालचाच असल्याचं सांगितलं.

विशालचा खून कसा झाला, याचा शोध घेत असतानाच पोलिसांना समजलं की विशालचा मित्र रणदिवे याने दारू पिताना झालेल्या वादातून विशालचा खून केला आहे. त्यानंतर पोलिसांनी रणदिवे याच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. रणदिवेच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

चौकशीदरम्यान त्यानं खुनाची कबुली दिली आहे. दारू पित असताना आरोपी विकीचा विशालशी वाद झाला होता. त्यावेळी राग अनावर झाल्याने विकीने विशालच्या गळा दाबून खून केला व त्यानंतर वीगो गाडीवरून मृतदेह नेत कॅनॉलमध्ये टाकला.

महत्वाच्या बातम्या-

आता धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे पण राज्य सरकारची तशी तयारी दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

राम मंदिराच्या भूमिुपूजनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; राम मंदिराचं भूमिपूजन आत्ता न होता…

राम मंदिराच्या भूमिुपूजनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; राम मंदिराचं भूमिपूजन आत्ता न होता…

आताही सांगतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही कारण…- राज ठाकरे

निष्ठावंतांना कात्रजचा घाट!; राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यपदी ‘या’ तरुणाची निवड?