दिशा सॅलियन आणि सुशांतचं नातं काय?; मुंबई पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

मुंबई | बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. दररोज समोर येणाऱ्या नवनवीन गोष्टींमुळे या प्रकरणातील गुंता आणखीनच वाढत चालला आहे. सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सॅलीयनच्या आत्महत्येचा सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंध असल्याचं बोललं जातं होतं. मात्र, मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता धक्कादायक खुलासा केला आहे.

दिशा सॅलीयन सुशांतची केव्हा मॅनेजर नव्हतीच, असं तपासात समोर आल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दिशा कामानिमित्त फक्त 23 दिवस सुशांतच्या संपर्कात आली होती. सुशांत आणि दिशाच्या व्हॉट्सअप आणि कॉल रेकॉर्डवरून हे स्पष्ट होत असल्याचं, पोलिसांनी सांगितलं आहे.

कॉर्नर स्टोन नावाच्या कंपनीत दिशा सेलेब्रिटी मॅनेजर म्हणून काम पाहत होती. कंपनीतील कामानिमित्त दिशा 1 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान सुशांतच्या संपर्कात होती. या अगोदर किंवा नंतर दिशा आणि सुशांतमध्ये कोणतंही संभाषण झालं नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा आणि सुशांतच्या व्हाट्सअप्प आणि कॉल रेकॉर्ड बरोबरच दिशाच्या कंपनीतील तिचे सहकारी, दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांचंही हेच म्हणणं आहे. सुशांत आणि दिशा दोघांमध्ये मृत्यूपूर्वी 2 महिने अगोदर संभाषण झालं होतं.

महत्वाच्या बातम्या-

इंदोरीकरांच्या पुत्रप्राप्तीच्या ‘त्या’ वक्तव्यावर न्यायालयानं बजावली महत्वाची भूमिका

पैसा कमावणं हा शिवसेनेचा एकमेव धंदा; नारायण राणेंची गंभीर टीका

धक्कादायक! सुशांतच्या एक्स मॅनेजरचा नग्नावस्थेत मिळाला होता मृतदेह

बाबा रामदेव यांना ‘कोरोनील’ पडलं महागात; हायकोर्टानं सुनावला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा दंड!

सुशांतच्या डायरीतील ती पानं नक्की फाडली कोणी?, सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण!