Loading...
देश

भारतात येणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहणार भिंत!

नवी दिल्ली | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत भेटीवर येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. तसेच ट्रम्प यांना वाटेत झोपडपट्टी दिसू नये यासाठी भिंत उभारली जात आहे.

अहमदाबादमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर एक झोपडपट्टी येते. ही झोपडपट्टी लपवण्यासाठी एक भिंत उभारण्यात येणार आहे. मात्र, याला स्थानिकांकडून विरोध करण्यात येत आहे.

Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्या धर्तीवर डोनाल्ड ट्रम्प यांचेही भव्य असे स्वागत करण्याचे केंद्र सरकारने आखले आहे. त्यामुळे त्यांना वाटेत कुठे गरिबी दिसू नये यासाठी झोपडपट्टी भिंतीने झाकण्यात येणार आहे.

मोदींचा अमेरिकेत ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम झाला होता. तसाच अहमदाबादमध्ये ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यावेळी ट्रम्प भारतीयांना संबोधित करतील.

महत्वाच्या बातम्या-

-“पवारांवर पीएचडी करणं ये आपके बस का काम नही है”

-“पवारांवर पीएचडी करणं ये आपके बस का काम नही है”

-पुलवामा हल्ल्याने कुणाचा फायदा झाला??- राहुल गांधी

-‘व्हॅलेंटाईन डे’ला विद्यार्थिनींना शाळेनं दिली शपथ; ‘मी प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही’!

-गेहलोत सरकारने ग्रामीण विकास योजनेचं नाव बदललं; गोळवळकर हटवून केलं महात्मा गांधी!

Loading...