मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले- राज ठाकरे

मुंबई | मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आहे.

राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये राज यांनी 14 जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे.

कोरोनाच्या कठीण प्रसंगात महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणात पदरमोड करुन लोकांच्या मदतीला धावून जात आहे. अन्नधान्य वाटपापासून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणं आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देणं, अशा बातम्या ऐकून मला आनंद आणि अभिमान वाटत राहायचा, अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझ्या सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘…हीच माझ्या वाढदिवसाची खरी भेट असेल’; आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

-“बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांना विश्वासात घेऊनच काम होतंय”

-राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद, त्या पदाचा मान राखून बोललं पाहिजे- देवेंद्र फडणवीस

-‘हवा तेज चल रही है उद्धवराव… खुर्सी संभालो’; ‘या’ भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

-…तर कोरोना चाचणी करण्याची गरज नाही- राजेश टोपे