लोकांनो कृपया गर्दी करू नका, आता सगळं व्यवस्थित होईल; मंत्री बाळासाहेब थोरातांना विश्वास

मुंबई |  लॉकडाऊन ही संकल्पना लोकांना माहिती नव्हती. कदाचित अनेक लोक प्रथमच लॉकडाऊनला सामारे जात आहेत. म्हणून त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी केली. मात्र आता त्यांचा संभ्रम दूर झाला आहे. त्यामुळे आता सगळं व्यवस्थित पार पडेल, असा विश्वास मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

सरकारने हमाल, अडते आणि इतर घटकांशी चर्चा केली आहे त्यानंतर सगळं आत्ता सुरळीत झालंय. आजपासून जी यंत्रणा उभी केली आहे या यंत्रणेमुळे भाजी पुरवठा सुरळीत होईल. एका मंडईमध्ये सर्व ग्राहकाने गर्दी करु नये, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.

वाढीव दराने भाजीपाला विकला जावू नये यासाठी सरकार खबरदारी घेणार आहे. हमाल आणि ग्राहक या दोघांच्या मनामध्ये भीती, ती आता दूर होईल, असंही थोरात म्हणाले.

दरम्यान, पोलिसांनी देखील या परिस्थितीत संयमाने काम करावं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राज्याच्या पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे परंतू हा काळ कठीण आहे. त्यामुळे सगळ्यांनीच संयमाने वागायला हवे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-कोरोनावर उपाय सुचवा, 42 लाख रूपये कमवा; केंद्र सरकारचं चॅलेंज

-बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार- अजित पवार

-कर्जावरील व्याज आकारणी थांबवा, इएमआयवर 6 महिन्यांसाठी बंदी घाला ; सोनिया गांधींनी मोदींना लिहिलं पत्र

-लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या जनतेसाठी उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा; मोदी सरकारने केली ही मोठी घोषणा