सुशांतसिंग राजपूत प्रकरणाला नाट्यमय वळण; सुशांतच्या घरातील ‘या’ व्यक्तिविरोधात तक्रार

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सी.बी.आय.च्या हाती सोपविलं असून सी.बी.आय याप्रकरणी अतिशय वेगानं तपास करत आहे. सी.बी.आय.नं 13 दिवसांच्या तपासानंतर सुशांतनं आ.त्मह.त्या केल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र सुशांत प्रकरणी रोज नवनविन खुलासे होत आहेत.

सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुशांत प्रकरणी सुरुवातीपासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या कुटुंबानं आत्तापर्यंत अनेक आरोप केले आहेत. मात्र, आता सुशांत प्रकरणात एक नवीन ट्वीस्ट समोर येत आहे. रिया चक्रवर्तीनं आता सुशांतच्या बहिणींविरोधीच गु.न्हा दाखल केला आहे.

रिया चक्रवर्तीनं वांद्रे पोलीस ठाण्यात गु.न्हा दाखल केला आहे. सुशांतची बहिण प्रियंका, मितू आणि डॉक्टर तरुण कुमार यांच्या विरोधात ही त.क्रार दाखल करण्यात आली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात रियानं गु.न्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, बे.काय.देशीर कृत्य करणे, अं.मली पदार्थ प्रतिबं.धक कायदा यांसह ऐकून 13 कलमांतर्गत सुशांतच्या बहिणींवर गु.न्हा दाखल केला आहे.

सुशांतच्या आजराविषयी संपूर्ण माहिती सुशांतच्या घरच्यांना होती. तरीही सुशांतच्या घरच्यांनी सुशांतच्या आजाराची माहिती लपवली. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुशांतला औषधं दिली, असे अनेक आ.रोप रियानं केले आहेत.

सुशांतची बहिण मितू सिंह 8 जून ते 12 जून या काळात सुशांतसोबत त्याच्या घरी होती. याच काळात सुशांतची तब्येत अचानक खराब झाली आणि त्याला मितू सिंगच जबाबदार आहे, असंही रियानं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. रियानं दाखल केलेल्या या तक्रारीमुळे सुशांतप्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान,सध्या एम्सची फॉ.रेंसिक टीम सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट पडताळून पाहत आहे. व्हिसेरा रिपोर्टवरून सुशांतला वि.ष देण्यात आल्याचा संशय एम्स मेडिकल टीमला आहे. सुशांत प्रकरणासाठी गठीत करण्यात आलेल्या मेडिकल बोर्डाचे चेअरमन आणि एम्स रुग्णालयाच्या फॉ.रेंसिक डिपार्टमेंटचे हेड डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितलं की, येत्या 10 दिवसात याचा तपास करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात लग्नात जेवताना ‘ही’ गोष्ट करण्यास मनाई; जाणून घ्या सर्व नव्या अटी!

चार एकरात लावली होती कोथिंबीर; मिळालं 12 लाख 51 हजार रुपयांचं विक्रमी उत्पन्न

सुशांतला ही गोष्ट देण्यात आली होती?; एम्सच्या मेडिकल टीमला संशय

पोरीनं बाप गमावला, मात्र महाराष्ट्राच्या आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा व्हिडीओ बनवला!

काय सांगता! ‘या’ चित्रपटासाठी सुशांतनं घेतलं होतं फक्त 21 रुपये मानधन!