Loading...
औरंगाबाद महाराष्ट्र

कोरोनामुळे औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला; इम्तियाज जलील यांची मागणी

औरंगाबाद |  कोरोनाचा धसका सगळ्या जगाने घेतलाय. कोरोनाने सगळीकडे आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. 

जर सगळीकडचेच सार्वजनिक कार्यक्रम रद्द होत असतील तर मग निवडणुका कशा घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलायला काय हरकत आहे? असंही ते म्हणाले आहेत. तसंच तोपर्यंत पालिकेवर प्रशासक नेमावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Loading...

जर याच काळात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पार पडली तर लोक एकत्रित येतील आणि धोका निर्माण होईल. दुसरीकडे शासन देखील जास्त मोठ्या प्रमाणात एकत्र जमू नका, असं आवाहन करतंय. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

दरम्यान, काही दिवसांवर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आली आहे. सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. मात्र या निवडणुकीवर कोरोनाचं सावट असल्याचं चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नो ‘हँडशेक’नंतर आता सभाही रद्द; पवारांचा खबरदारीचा उपाय

-“साहेब.. आता वनवास संपलाय, लवकरच अयोध्येकडे निघावं लागेल”

-माझ्याकडे जन्माचा दाखला नाही मग मी काय जीव देऊ का?; मुख्यमंत्र्यांचा मोदी-शहांना सवाल

-मराठीत भाषण न केल्यामुळं मला रोखलं; सदावर्तेचा शिवसेनेवर गंभीर आरोप

-गृहखात्यावर नांदगावकरांची तर जलसंपदावर अनिल शिदोरेंची नजर; पाहा मनसेचं शॅडो कॅबीनेट

Loading...