“….नाही तर गोपीचंद पडळकरांना काळे फासणार”

पुणे |  पडळकर कसलीही शारिरीक व बौद्धिक पातळी नसलेला माणूस असून त्यांच्या विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा घेण्यात यावा; भाजपकडून पडळकरांवर कारवाई झाली नाही तर कार्यकर्त्यांच्या वतिनं काळे फासले जाईल. असा इशाराच पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी दिला आहे.

“सांगली व बारामतीचा पराभव पडळकरांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. धनगर समाजातील त्यांच स्थान शून्य झाल्यानं काहीतरी आक्रमक करण्यासाठी त्यांनी जेष्ठ नेते शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका केली आहे.”, असं धुमाळ म्हणाल्या.

पडळकरांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी पडळकरांविरोधात राज्यव्यापी आंदोलनाच्या तयारीत आहेत. तर भाजप नेत्यांनी ही पडळकरांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत हात वर केले आहेत.

दरम्यान, बारामती विधानसभा निवडणूकीपासून पवार विरुद्ध पडळकर हा वाद विकोपाला गेला. आता पडळकरांच्या आक्षेपार्ह विधानानंतर पुन्हा नव्यानं या वादाला तोंड फुटलं आहे.

 

-शरद पवारांवरील जहरी टीका भोवण्याची शक्यता; पडळकरांवर कारवाईचा इशारा

-इतिहासात पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलपेक्षा महाग; आजही रेकॉर्डब्रेक भाववाढ!