पक्षाला ज्यांनी शिव्या घातल्या त्यांना तिकीट दिलं; उमेदवारी डावलल्यानंतर खडसेंचं आक्रमक रूप

मुंबई |   विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 तारखेला निवडणूक होत आहे. भाजपने आपले चार उमेदवार घोषित केलं आहेत. दिग्गजांना डावलून भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांचा पत्ता भाजपने कट केला आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर खडसेंनी आक्रमक रूप धारण करत स्वपक्षावर टीकेचे बाण सोडले आहेत.

ज्यांनी पक्षासाठी खस्ता रस्ता खाल्या आहेत त्यांना जर उमेदवारी मिळाली असती तर मला आनंद वाटला असता, अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त करत ज्या गोपीचंद पडळकरांनी भाजपला शिव्या घातल्या तसंच पंतप्रधान मोदींच्या सभेवर बहिष्कार घातला होता त्याच पडळकरांना आता भाजपने उमेदवारी दिली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, असं खडसे म्हणाले.

आम्हाला प्रथमत: आम्हाला सांगण्यात आलं की खडसे, पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांचं नाव दिल्लीला शिफारस म्हणून पाठवलं आहे. मात्र सध्या जी नावं येत आहेत ती नावं नवीन आहेत. म्हणजेच नव्या चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे, असं खडसे म्हणाले.

नागपुरचे माजी महापौर आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दटके, बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवलेले गोपीचंद पडळकर, माजी उपमुख्यमंत्री आणि लोकसभेवेळी भाजपात प्रवेश केलेले विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह मोहिते पाटील आणि डॉ. अजित घोपछडे यांच्या यांना विधानपरिषद उमेदवारीची लॉटरी लागली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष नक्की कोणत्या दिशेने चालला आहे, याचं चिंतन करण्याची आम्हाला गरज आहे, असा सूरही त्यांनी आळवला. दुसरीकडे भाजपचे चारही उमेदवार आपला विधानपरिषदेचा अर्ज भरण्यासाठी विधीमंडळ परिसरात रवाना झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-गरीबांच्या खात्यात साडे सात हजार रूपये जमा करा; राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी

-पदवी, पदव्युत्तर परीक्षांबाबत उदय सामंतांचा मोठा निर्णय, वाचा कुणाच्या होणार परीक्षा अन् कुणाच्या नाही…!

-दिग्गजांना बाजूला सारत भाजपने विधानपरिषदेसाठी 4 उमेदवार केले जाहीर!

-सध्याच्या मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढलंय, म्हणून त्यांना काही फरक पडत नाही- निलेश राणे

-जितेंद्र आव्हाडांनी केली कोरोनावर मात