Uncategorized

मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांवर…..- एकनाथ खडसेंची ठाकरे सरकारवर टीका

जळगाव | कारोनामुळे बळीराजालाही शेतीच्या कामात त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांमागे बोगस बी-बियाणे असल्याने मोलामहागाईचं बी पुन्हा वाया गेलं. त्यानंतर दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचणीमुळे पेरणी झाली नाही. त्यामुळे शेतकरी परेशान झाला आहे. पीकांवर फवारणीसाठी खतांची टंचाई अशा अनेक गोष्टींमुळे शेतकऱ्याला त्रास झाला आहे. यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मी पाच वर्ष कृषिमंत्री असताना एकदाही खताची टंचाई निर्माण झाली नाही. माझ्या काळात खताचा पुरवठा व्यवस्थित होत होता. त्यावेळी तसंच उत्तम समन्वय होता . आम्ही युरिया खताचे दर हे स्थिर ठेवले. आता मात्र सरकारमधील कोणाचाच समन्वय राहिलेला नाही, असं एकनाथ खडसे यांन म्हटलं आहे.

काही दुकानदार युरियाची साठेबाजी करत आहे त्यामुळे युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही खडसे यांनी केली आहे.

दरम्यान, आमच्या काळात शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत यावर राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, असंही खडसे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-   

‘…म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नाही’; ट्रोलर्सच्या प्रश्नांवर मौन सोडत अंकिता लोखंडेनं सांगितलं कारण

अबब ! कोरोना नसतानाही तरुणावर केले कोव्हीडचे उपचार अन्…

संतापजनक! देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानानंच महिलेबरोबर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली- उपमुख्यमंत्री

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर दु: खाचा डोंगर; राजेश टोपेंच्या मातोश्रींचं निधन