Top news कोल्हापूर महाराष्ट्र

“देवेंद्र फडणवीसांची सध्याची अवस्था उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशीये”

devendra fadanvis 1 e1634222568265
Photo Credit- Facebook/Devendra Fadnavis

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोल्हापूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेच्या सांगता सभेत एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नेहमीप्रमाणे फडणवीसांवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं.

देवेंद्र फडणवीस हे सत्तासुंदरी कशी मिळेल याच चिंतेत आहेत. त्यांची अवस्था उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, अशी झाली आहे, अशी बोचरी टीका एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर केली आहे.

या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे हे उपस्थित होते.

सभेत बोलताना शरद पवारांनी देखील भाजपवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना पवारांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे आदींसह मान्यवर नेते उपस्थित होते

तपास यंत्रणेचा गैरवापर करून आमची तोंडे बंद करू शकतो, असं जर कोणाला वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या प्रवृत्तीचा योग्य प्रकारे समाचार घेत भाजपला उखडून टाका, असं शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

Sharad Pawar: शरद पवार यांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले… 

KGF-2 आणि RRR सिनेमावर नवाजुद्दीन सिद्दीकी चांगलाच भडकला, म्हणाला ‘अभिनय गेला तेल लावत…’

“राष्ट्रवादी 1 नंबरचा पक्ष होणार, आपला मुख्यमंत्री झालाच पाहिजे”

‘लग्न झालेल्या पुरुषांमध्ये…’; आझमा फलाहच्या वक्तव्याची एकच चर्चा

“निव्वळ लज्जास्पद, एवढीच तुमची मदुर्मकी?…”, राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर फडणवीस कडाडले