सुप्रिया सुळेेंच कौतुक करताना नाथाभाऊ म्हणतात…

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे आपल्या आवडत्या खासदार असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितलं होतं. त्यानंतर, चांगल्या कामाची दखल घेतली, तर राजकारणात चांगले दिवस येतील, अशा भावना एकनाथ खडसेंनी व्यक्त केल्या आहेत.

रक्षा खडसे आणि सुप्रिया सुळे संसदेत एकत्र काम करतात. राजकारण्याच्या पलिकडे जाऊन त्यांनी एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं आहे. सुप्रियाताईंनी चांगलं काम केलं. आम्ही त्यांचं नेहमी कौतुक करत आलेलो आहोत. असं मत एकनाथ खडसेंनी मांडलं.

काही गोष्टी या राजकारणा पलिकडच्या असतात. योग्य कामाची दखल घेतली पाहिजे. त्यात राजकारण आडवं येता कामा नये. चांगल्या कामाची जर दखल घेतली, तर राजकारणामध्ये चांगले दिवस येऊ शकतात, असंही एकनाथ खडसे यावेळी बोलताना म्हणाले.

दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या 48 खासदारांपैकी आवडतं कोण? हा प्रश्न विचारला असता खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावचा आवाज संसदेत मांडणाऱ्या रक्षा खडसे आपल्या आवडत्या महिला खासदार असल्याचं सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या- 

-कोरोना पसरतोय जगभरात; महाराष्ट्रातील 600 यात्रेकरु अडकले इराणमध्ये

-खटला चालवण्यास केजरीवाल सरकारने मंजुरी दिल्यानंतर कन्हैया कुमारची पहिली प्रतिक्रिया म्हणतो; …

-“केंद्र सरकारने ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करण्याचा ठराव फेटाळला”

-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 1 लाख 1 हजार पदांची होणार मेगाभरती

-‘बळीराजा नको करू आत्महत्या’ शाळेत मुलाची कविता; शेतकरी बापाची घरी आत्महत्या