शरद पवारांसोबत कोणतीही भेट झालेली नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका- एकनाथ शिंदे

मुंबई | राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती.

पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पालिकेच्या आपत्तीव्यवस्थापन कक्षात गेले होते. त्यानंतर ते थेट पवारांच्या निवावस्थानी गेले. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकटेच होते, त्यांच्यासोबत अन्य कोणताही नेता नव्हता अशी माहिती होती. मात्र या भेटीचं वृत्त मुख्यमंत्री कार्यालयाने फेटाळलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

शिंदेंनी देखील ट्विट याबाब स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

दरम्यान, शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजप व एकनाथ शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल आणि विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असं भाकीत केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“चार लोकांच्या कोंडाळ्यानं आमच्या उद्धवसाहेबांना बावळट केलं” 

महाराष्ट्रासाठी जे जरूरी होतं तेच झालं -अमृता फडणवीस

रशिया-युक्रेन युद्धाबाबत पुतिन यांच्याकडून अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा, शिवसेनेच्या गोटात खळबळ

बाळासाहेबांच्या प्रेमापोटी शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय