Top news देश

आजारी वडिलांना घेऊन 7 दिवसांत 1200 किमी सायकल प्रवास; ज्योती कुमारचं इवांका ट्रम्पकडून कौतुक

नवी दिल्ली |  लॉकडाऊनमध्ये गुरुग्रामवरुन वडिलांना सायकलवर बसवून 1200 किलोमीटर प्रवास 15 वर्षीय ज्योतीने केला. याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पने देखील तिचं कौतुक केलं आहे.

15 वर्षाची ज्योती कुमारी आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून सात दिवसात 1,200 किमीचं अंतर पार करत गावी घेऊन गेली. सहनशक्ती आणि प्रेमाच्या या वीरगाथेनं तिनं भारतीय लोकं आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं लक्ष वेधलं आहे, अशा शब्दात इवांका ट्रम्पने ज्योतीचं कौतुक केलं आहे.

ज्योती कुमारीनं आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल गुरुग्रामवरुन दरभंगा असा 1200 किमी अंतर प्रवास केला आहे, त्यामुळे संपूर्ण देशातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान ज्योतीच्या या जिद्दीचं कौतुक सर्वत्र होत असून आता सायकलिंग फेडरेशननेही तिची दखल घेतली आहे. ज्योतीची कहाणी ऐकल्यानंतर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावलं आहे. ज्योतीने चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली, तर राष्ट्रीय सायकलिंग अकादमीच्या कॉम्प्लेक्समध्ये ट्रेनी  म्हणून तिची निवड होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-धोक्याची घंटा…. गेल्या 48 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची बाधा

-‘भाजपच्या रणांगणातून’ ही प्रमुख आणि महत्त्वाची व्यक्ती गायब, राज्यभर चर्चांना उधाण

-संकटात सापडलेल्या राज्याला सावरायचं सोडून आंदोलन करून दुहीची बिजं पेरली; आव्हाडांची टीका

-बंगालचं 1 लाख कोटी रूपयांचं नुकसान झालेलं असतानं 1 हजार कोटीत नुकसान कसं भरून येईल?- संजय राऊत

-नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; 4-5 वर्षांपासून…