WHO ने टेंशन वाढवलं; भारतीयांना दिला अत्यंत धक्कादायक इशारा

मुंबई | देशात सध्या कोरोना संसर्गाचा धोका अजूनही टळलेला नाही. अजून कोरोनाचं संकट कायम आहे. कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही.

काही शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु संकट अजून गेलेलं नाही, असं पूर्व आशियाच्या WHO च्या प्रादेशिक संचालक पूनम सिंग यांनी सांगितलं आहे.

आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच कोरोना प्रोटोकॉल आणि लसीकरण यासारख्या कार्यक्रमांना गती देण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भारतातील तिसऱ्या लाटेसाठी ओमिक्रॉन जबाबदार आहे. ओमिक्रॉन हा एक गंभीर आजार आहे. आणि तो मागच्या आजारांपेक्षा जास्त धोकादायक आहे, असंही WHO तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

बऱ्याच देशांमध्ये संसर्ग अधिक झाल्यामुळे रूग्णांचं रूग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही त्याचा ताण पडला आहे.

एका पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी असं म्हटलं आहे की, संसर्ग कमी होण्याची चिन्हे आहेत. याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

भारतात शनिवारी 2 लाख 35 हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. जे शुक्रवारच्या तुलनेत सुमारे 16 हजार लोक कमी आढळले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

लसीकरण ही एक उत्तम पद्धत आहे. लसीकरणामुळे संसर्ग झालेल्या रूग्णाला कोणत्याही प्रकारचा गंभीर धोका निर्माण होणार नाही. आणि त्याच्या जीवाला हानी निर्माण होणार नाही.

आम्हाला असं वाटत आहे की, ही लस अधिक प्रभावी नाही. त्यामुळे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु बूस्टर डोस ओमिक्रॉनपासून संरक्षण करू शकतो, असं WHO ने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

कर्नाटक हिजाब प्रकरणावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या… 

रानू मंडल पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात, यावेळी केलं ‘हे’ मजेशीर काम 

Hyundai नं आणली सर्वात स्वस्त कार, टाटाच्या या कारचं मार्केट डाऊन होणार? 

“अहंकाराने त्यांनी गुजरातची दोन गाढवं म्हटलं होतं पण…” 

मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, सचिन वाझेचा खळबळजनक दावा