महाराष्ट्र मुंबई

काय सांगता??? फेसबुकवर आता चक्क पैसे कमवण्याची संधी

मुंबई | सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक आता आपल्या यूझरला पैसे कमवण्याची संधी देणार आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून फेसबुक वापरकर्त्यांना आता पैसे कमवता येणार आहेत.

फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी यूझरला यापूर्वी कोणतेही पैसे पे करावे लागत नव्हते, मात्र आता पेड फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी वापरकर्त्यांना पैसे पे करावे लागणार आहेत. अर्थात हा प्रीमिअम कन्टेंट असेल, त्यामुळे फेसबुक लाईव्हची क्वालिटी वाढायला मदत होईल.

अर्थात जे लोक आपला परफॉर्मन्स लाईव्ह करणार आहेत, त्यांना तो विनामूल्य ठेवायचा की त्यासाठी पैसे आकारायचे असा पर्याय असणार आहे. त्यांनी जर पैसे आकारण्याचा पर्याय निवडला तर पाहणाऱ्याला पैसे भरावे लागतील.

दुसरीकडे जमा झालेले पैसे फेसबुक थेट संबंधित लाईव्ह करणाराच्या खात्यात जमा करणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कलाकार फेसबुक लाईव्ह करत असतात त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी मानली जातेय.

महत्वाच्या बातम्या-

-ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भाजपकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा

-“मुंबई-पुण्यातील शेतकरी, मजुरांच्या मुलांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा”

-IFSC गुजरातला नेलं जात असताना फडणवीसांनी बोटभर चिट्ठी लिहूनही विरोध केला नाही- पृथ्वीराज चव्हाण

-दिलासादायक! रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला, आत्तापर्यंत 10,000 रुग्ण परतले घरी

-‘असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद’; अखिलेश यादव यांची मोदींवर टीका