महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ‘ती’ घोषणा फसवी!

मुंबई | ऐन ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने बळीराजाला त्रस्त केलं होतं. हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला होता. त्याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अभुतपूर्व घडामोडी घडत होत्या आणि राजकीय उलथापालथ होत होती. अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चार दिवसांचं हे सरकार…! याच 4 दिवसांमध्ये राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली पण ती घोषणा आता फसवी निघाली असल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता त्यांच्या आधिकृत ट्वीटर हँडलवरून शेतकऱ्यांसाठी 5380 कोटींच्या मदतीची घोषणा केली. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यादव यांनी याचसंबंधीच्या कागदपत्रांची मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री सचिवालयाला माहिती मागितली.

Loading...

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यादव यांना जनमाहिती अधिकारी वृषाली चवथे यांनी माहिती देताना म्हटले आहे की. 23 नोव्हें 2019 ते 26 नोव्हें. 2019 या काळात एकही फाईल मुख्यमंत्री कार्यलयात आली नाही किंवा बाहेर गेली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या या माहितीवरून तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दाखवलेला कळवळा दाखवण्यापुरता होता, हे आता स्पष्ट होतंय.

दरम्यान, फडणवीसांनी प्रत्येक भाषणात आपण शेतकऱ्यांसाठी किती चांगलं काम करतो आहोत, हे ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम केलं, अशा संतप्त भावना नितीन यादव यादव यांनी व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-रंगेल महाराज भागवत कथा सांगायला आला अन् गावातल्या बाईला नादी लावून तिला घेऊन पळाला!

-CAA, NRC मागे घेत नाही तोपर्यंत उठणार नाही; नागपाड्यातल्या आंदोलक महिलांचा एल्गार!

-कोपर्डी खटल्याच्या महत्वाच्या सुनावणीला वकील गैरहजर; संभाजीराजे संतापले

-माझ्या भोवती महिला भगिणींचं कवच… मज काय कुणाची भिती- नरेंद्र मोदी

-कर्जमुक्ती करून आपण शेतकऱ्यांवर उपकार करत नाही- उद्धव ठाकरे