कोरोनामुळे लग्नाच्या खर्चात बचत; शेतकरीपुत्राची अनाथ मुलांच्या माहेर संस्थेला आर्थिक मदत

पुणे | कोरोनामुळे लग्न समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने पार पडत आहेत, त्यामुळे वाचलेल्या खर्चातील काही रक्कम समाजकार्यासाठी देण्याचा नवा आदर्श शेतकऱ्याच्या मुलानं घातलंय. सचिन आप्पासाहेब मासळकर असं या शेतकरीपुत्राचं नाव आहे.

सचिन पुण्याच्या शिरुर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथील रहिवासी आहे. नुकताच त्याचा विवाह विवाह श्रीक्षेत्र वढू येथील सत्यवान भंडारे यांची कन्या सुप्रियासोबत पार पडला. कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं.

लग्नसभारंभ पार पडताच वधू वराच्या हस्ते माहेर संस्थेला ११ हजार रुपयांचा चेक देण्यात आला. माहेर ही अनाथ मुलांसाठी काम करणारी संस्था आहे त्यामुळे तिला ही मदत देण्यात आली.

दरम्यान, ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात असेही काही घटक असतात ज्यांना आपल्या मदतीची गरज असते. आपल्या आनंदाच्या प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलावा यासाठी ही फुल न फुलाची पाकळी देत असल्याचं सचिन यांनी सांगितलं. कोरोनामुळे लग्नाचा खर्च वाचत असल्याने त्यातील काही रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्याचा नवा पायंडा यानिमित्ताने सचिनसारख्या शेतकरीपुत्राने सुरु केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसची ‘न्याय योजना’, राज्यातील 29 हजार कुटुंबांना प्रत्येकी ‘इतक्या’ रुपयांचं वाटप

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय

-‘परप्रांतीयांच्या जाण्याने रिक्त जागांवर रोजगाराची संधी साधा’; शिवेंद्रराजेंचं स्थानिकांना आवाहन

-निलेश राणेंविरोधात तृतीयपंथी समाजाकडून गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण…

-‘धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ’; जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र