महाराष्ट्र औरंगाबाद

धक्कादायक! शेतकरी विष पीत असताना सावकार काढत होता व्हीडिओ, शेतकरी मृत्यूच्या दारात

Faremer 012

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या शेतात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

विशेष म्हणजे तो सावकार शेतकरी विष पित असतानाचा व्हीडिओ शूट करत होता. विष पिल्यानंतर शेतकरी तडफडत असतानाही सावकार त्याला रुग्णालयात घेऊन गेला नाही.

बहिणीच्या लग्नासाठी शेतकऱ्याने आपली पावणे चार एकर जमीन सावकाराकडे गहाण ठेवली होती. त्या बदल्यात सावकराकडून 2 लाख रुपये कर्ज घेतले होते. आत्तापर्यंत 5 लाख रुपये परत केले तरीदेखील सावकाराने जमीन परत केली नाही, असा आरोप सावकारावर आहे. 

दरम्यान, पैसे परत करुनही सावकाराने जमीन परत न केल्याने शेतकऱ्याने शेतातच विष पिलं. पीडित शेतकरी सध्या रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत आहे.